जळगाव (प्रतिनिधी) आजवर आलेल्या साथ आजारांचा विचार करता दुसरी लाट नेहमी सुप्त असते, पण कोरोना मात्र त्याला अपवाद ठरत आहे. त्यामुळे जास्त धोकेदायक आहे. आगामी काळात रुग्णांची संख्या वाढली असता अपुरे मनुष्यबळ ठेवून आपल्याला साथीचा अटकाव करता येणार नाही. म्हणून किमान जळगाव जिल्ह्यामध्ये २४ तास सलग १५ दिवसाचे कठोर निर्बंध युक्त संचारबंदी लावावी, अशी मागणी भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव, प्रभाव आणि प्रकोप संपूर्ण जळगाव जिल्हा अनुभवत आहे. काल तर संपूर्ण जळगाव जिल्हात काल तर १०९० नवीन रुग्ण सापडल्याने नवा उच्चांक गाठला गेला आहे. सरकारी यंत्रणा त्यांच्या त्यांच्या परीने संक्रमण रोखण्यासाठी, योग्य उपचार होण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यात काही प्रमाणात यश मिळत आहे. पण लोकसहभाग मात्र हवा तसा दिसत नाही. जनतेला आपले अधिकार लक्षात राहतात पण कर्तव्य मात्र सोयीस्करपणे विसरली जातात, त्याचाच परिणाम म्हणजे सध्याचे जळगाव जिल्हाचे चित्र आहे. २२ मार्च २०२० ला भुसावळ शहरातील परिस्थिती आणि आज तब्बल एक वर्षांनी परिस्थिती फार बदलली आहे, जनता बिनधास्त झाली आहे, काही प्रमाणात स्थानिक प्रशासन सुद्धा जबाबदार आहे.
आजचे दैनिक वृत्तपत्र पाहिले असता, एकीकडॆ रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर नाही, दुसरीकडे धूळखात पडून, दुसऱ्या लाटेचा उच्चांक, अश्या विविध बातम्या समाजमनावर परिणाम करत आहे. रात्रीची संचारबंदी न करता सलग १५ दिवस (२४ तास) कठोर निर्बंध युक्त संचारबंदी करावी तरच कोरोना संक्रमण आटोक्यात येण्यास मदत होईल. असेही डॉ. नि. तु. पाटील यांनी म्हंटले आहे.
अत्यावश्यक सेवा सोडून,
दवाखाने/मेडिकल खाजगी सकाळी १० ते ४, (आपत्कालीन सेवा २४ तास सुरू)
दूध डेअरी सकाळी ६ ते १० संध्याकाळी ६ ते ८,
किराणा दुकान सकाळी १० ते ४,
भाजीपाला गल्लोगल्ली सकाळी ७ ते १,
बँक सकाळी १० ते ४,
रेशन दुकान सकाळी १० ते ४.