जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १६९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ८४, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ- १२, अमळनेर- ०५, चोपडा-०४, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-०५, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-०६, रावेर-०३, पारोळा-०७, चाळीसगाव-२३, मुक्ताईनगर-१०, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण १६९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५८ हजार ०२१ पर्यंत पोहचली असून ५५ हजार ९८५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत १३६९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ६६७ रुग्ण सध्या उपचार घेताय.