धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेची या पंचवार्षिकमधील शेवटची सर्वसाधारण सभा आज झाली. यामध्ये अजेंड्यावरील विविध सर्व १८ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शिवसेनेसह भाजपच्या सर्व नगरसेवकांचे आभार मानत गावातील विकास कामांचे श्रेय सर्व नगरसेवकांना दिले.
धरणगाव नगरपालिकेतील सत्ताधार्यांची पंचवार्षिक सत्ता २६ डिसेंबर रोजी संपणार असून यानंतर पालिकेवर प्रशासकराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमिवर, पालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातवरणात पार पडली. आजच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम, रस्ते कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, नाल्यांवर संरक्षण भिंत बांधणे, विविध भागांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे यासह विविध १८ विषय मंजूर करण्यात आले.
हे १८ विषय होते अजेंड्यावर
१. मागील सभेचे कार्यवृत्त वाचून मंजुर करणे. २. धरणगाव नगरपालिकेतील विविध विभागांसाठी वार्षिक निविदा मागविणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. ३. प्रभाग क्रमांक १ मध्ये विविध विकास कामे करणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. ४. प्रभाग क्रमांक ५ आणि प्रभाग क्रमांक ६ मध्ये विविध विकास कामे करणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. ५. प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध विकास कामे करणे बाबत विचार विनीमय करुन निर्णय घेणे. ६. धरणगाव नगरपरिषदेस चार्टड अकाउंटेंटसाठी आलेल्या दरपत्रकास मंजूरी मिळणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. ७. अमळनेर चोपडा रोड चौफुलीस महाराणा प्रतापसिंह नामकरण करणेस शिवसेना शहर शाखा आणि समस्त राजपूत समाज यांचे कडून आणि संजय नगर येथील माजी नगरसेवक धुरेकर यांचा घरा जवळील चौकांस एकता चौक असे नामकरण करणेस श्री. अमोल अर्जुन चौधरी व शिवसेना शहर शाखा यांचे कडून आलेल्या अर्जाचा विचार विनीमय करून निर्णय घेणे.
८. दिपक सखाराम चौधरी यांना मानधन तत्वावर नगरपालिका सेवेत कामावर घेणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. ९. प्रभाग क्रमांक ८ मध्ये कृष्ण गीता नगर, स्वामी समर्थ गीता नगर, श्री महाराणा प्रताप नगर, कुलट वाड किकाभाई बोहरी ते रेल्वे गेट पर्यंत, अमोल टी सेंटर पासून कै. शशिकांत अग्निहोत्री यांचे घरापर कॉक्रीटीकरण रस्ता करणे, गटार बांधकाम करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविणे बाबत असे विविध कामे करणे बाबत आणि शिवसेना शहर शाखा यांचे कडून स्वामी समर्थ नगर जवळील नाला रेल्वेच्या हद्दीपर्यंत बांधकाम करणे बाबत आलेल्या अर्जांचा विचार विनीमय करून निर्णय घेणे. १०. प्रभाग क्रमांक ९ मध्ये इन जनाब से कालू यस्ताद, रवि हारपे यांचे घरा पासून ते मनोज तिवारी, अनिल भिमा ते अजय धनगर, रुपचंद नाईक से बाबूला भोई, पाणीची टाकी पासून ते भाटीया याचे घरापर्यंत कॉक्रीटीकरण रस्ता करणे, गटार बांधकाम करणे विविध कामे करणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. ११. धरणगाव शहरातील सर्व मालमत्तांची कर प्रात्र मुल्यात दर चार वर्षात एकदा होणारी सुधारणा करणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे.
१२. प्रभाग क्रमांक २ मध्ये धनराज बाबा यांच्या घरा समोरील ते ताजु शेट यांच्या घरा समोरील चौकात आणि कमु पिंजारी यांच्या घरा समोरील चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच भिल याडा वस्तीत आणि श्री. संतोष एकनाथ महाजन यांचे घरापासून ते सार्वजनिक शौचालय पर्यंत, लाईन मोहल्ला मध्ये विविध ठिकाणी रस्ता कॉक्रीटीकरण करणे आणि लाईन मोहल्ला जवळील शौचालय दुरुस्ती करणे बाबत विचार करुन विनीमय करून निर्णय घेणे. १३. संजय नगर, हनुमान नगर, नेहरु नगर मधील अतिक्रमीत घरांना कायम स्वरुपी करुन नंबर देण्याबाबत विचार करुन विनीमय करून निर्णय घेणे. १४. सौ. निर्मला राजु पचेरवार, सफाई कामगार यांचा दि. १५/१२/२०२१ च्या अर्जानुसार स्वेच्छा निवृत्ती मिळून त्यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या मुलगा श्री. चेतन राजु पचेरवार यांना लाडकमेटीच्या शिफारसीनुसार नियुक्ती मिळणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. १५. श्री. पुनित सुहास थोरात यांचा दि.१३/१२/२०२१ रोजीचा अर्जा वरुन लिपीक पदाचा पदोन्नती मिळणे बाबत विचार विनीमय करुन निर्णय घेणे. १६. सन २०२१-२२ या वर्षाच्या माहे डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ अखेर फक्त आठवडे बाजाराचा लिलाव करणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. १७. सन २०२२-२३ या वर्षाच्या आठवडे बाजार, दैनिक बाजार आणि कोंबडी बाजार यांच्या लिलाव करणेस मंजूरी देणे बाबत विचार विनीमय करून निर्णय घेणे. १८. म. अध्यक्ष सो. यांचे पूर्व परवानगीने आयत्या वेळेस येणारे ५ विषय चर्चेस घेवून निर्णय घेण्यात यावे.
नगरसेवक ललित येवले यांनी सर्व विषय मंजूर करण्याचे केले आवाहन
धरणगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच भाजपचे नगरसेवक ललित येवले यांनी सर्व १८ विषय मंजूर करण्याचे आवाहन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना केले. त्यावर सभागृतील वातावरण एकदम सहज होऊन गेले. कारण शेवटची सभा असल्यामुळे विरोधक म्हणून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडतील असे मानले जात होते. परंतु संपूर्ण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
…आणि नगराध्यक्ष निलेश चौधरी झाले भावूक
शहरात आपल्या कार्यकाळात झालेली विकास कामे ही माझ्या एकट्यामुळे नव्हे तर सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शक्य झालीत. सर्व नगरसेवकांनी मला सहकार्य केले. त्यामुळे सर्वांचे आभार मानतो. तसेच यापुढेही आपण सर्वजण शहराच्या विकासासाठी कटिबध राहू, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलत असतांना नगराध्यक्ष निलेश चौधरी झाले हे भावूक झाले होते. यावेळी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी देखील सर्व नगरसेवकांचे आभार मानत, शहराच्या विकासाठी यापुढेही सर्वांच्या सोबत असल्याचे सांगितले.
सभेच्या शेवटी नगरसेवकांचे फोटो सेशन
धरणगाव नगर पालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेनंतर सर्व नगरसेवकांनी एकत्र फोटो काढत सभागृहातील आपल्या आठवणी जपून घेतल्या. पाच वर्षाच्या कार्यकाळात झालेले वादविवाद, मतभेद, मनभेद विसरत सर्वानी एकत्र फोटो काढून सभागृहातील शेवटच्या सभेचा आणि आपल्या कार्यकाळाचा शेवट गोड केला.
संगीता गुलाब मराठे यांची अनुउपस्थिती चर्चेचा विषय
नगर पालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेला भाजपच्या नगरसेविका संगीता गुलाब मराठे यांची अनुउपस्थिती चांगलाच चर्चेचा विषय ठरली. गुलाब मराठे हे भाजपातील महत्वाचे कार्यकर्ते मानले जातात. तसेच गावातील मराठा समाजातील ते एक मोठे व्यक्तिमत्व आहे. गुलाब मराठे यांचे जवळपास सर्वच राजकीय पक्षातील लोकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच शेवटच्या सर्वसाधारण सभेला नगरसेविका संगीता मराठे यांची अनुउपस्थिती राजकीय दृष्ट्या चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
Leatest news