चोपडा (प्रतिनिधी) बसमध्ये चढताना खिसेकापूने गर्दीचा फायदा घेत प्रवाशाच्या पँटमधून 20 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भैय्यासाहेब विजय पाटील (34, शिवकॉलनी, चोपडा) हे मेडीकल व्यावसायीक आहेत. सोमवार, 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ते चोपडा धरणगावमार्गे जाणारी बस क्रमांक (एम.एच.20 बी.एल.1407) मध्ये चढत असतांना त्यांच्या पँटच्या खिश्यातील 20 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली. ही घटना घडल्यानंतर त्यांनी पूर्ण बस तपासून पाहिली परंतू पैशांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी तीन वाजता त्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहे.