जळगाव (प्रतिनिधी) गुलाबरावजी पाटील फाउंडेशन व महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे २ हजार लसीचे लसीकरण शिबिर पाळधी येथे बुधवारी घेण्यात आले. याप्रसंगी शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पाळधी बु आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, पाळधी खुर्द आरोग्य उपकेंद्र, महात्मा फुले जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या चार केंद्रांमध्ये २ हजार लसीचे लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील, डॉ. नरेश पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, चंदू माळी, डॉ. रितुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते भूषण महाजन, आरोग्य सेवक प्रशांत पाटील, अतुल नन्नवरे, सामाजिक कार्यकर्ते संजू महाराज, ग्रामपंचायत सदस्य दिगू माळी, पप्पू माळी, पिंटू कोळी, युवा सेना शहर प्रमुख आबा माळी, गोकुळ नन्नवरे आदी उपस्थित होते.