जळगाव (प्रतिनिधी) कोणताही ओटीपी किंवा लिंकचा वापर न करता तसेच कोणताही व्यवहार न करता मांगीलाल बनयारीलाल पारिक (वय ६५, रा. नेहरुनगर) या ट्रान्सपोर्ट व्यवसायीकाच्या बँक खात्यातून ३ लाख ६६ हजार ८९३ रुपये बँक खात्यातून परस्पर ट्रान्सफर करीत फसवणुक केली. ही घटना दि. २९ रोजी त्यांच्या मोबाईल मॅसेज आल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नेहरु नगरात राहणारे मांगीलाल पारिक यांचा ट्रान्सपोर्ट नगरात पुजा रोड कॅरियर नावाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचे एचडीएफसी बँकेत ट्रान्सपोर्टचा व्यवसायाचे खाते असून त्यावरुन त्यांचा व्यवहार चालतो. दि. २९ रोजी त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून ९९ हजार ८०० रुपये काढल्याचा मॅसेज आला. त्यांनी याबाबत त्यांचा मुलाला विचारणा केली असता, त्याने ऐवढ्या रकमेचा आपण कुठलाही व्यवहार केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच एका पाठोपाठ एक पाच मॅसेज आले. त्या मॅसेजच्या माध्यमातून पारिक यांना त्यांच्या बँक खात्यातून ३ लाख ६६ हजार रुपये काढल्याचे समजले.
रक्कम कोठे वर्ग झाली हे समजले नाही
आपल्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ६६ हजार रुपये काढल्याचा मॅसेज आल्यामुळे पारिक यांनी लागलीच बँकेत धाव घेतली. त्यांनी शाखा व्यवस्थापकाला बँक खात्याविषयी चौकशी केली असता, त्यांनी ही रक्कम नेमकी कोठे वर्ग झाली याबाबत सांगता येणार नसल्याचे सांगितले.
कोणताही व्यवहार न करता घातला गंडा
मांगीलाल पारिक यांनी कोणताही ओटीपी किंवा फसव्या लिंकचा वापर न करता, तसेच कोणताही व्यवहार न करता त्यांच्या बँक खात्यातून ३ लाख ६६ हजर रुपये परस्पर ट्रान्सफर झाल्याने पारिक यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.














