पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या बांभोरी प्र. चा येथील एका घरातून ३० हजारांचे दोन मोबाईल फोन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात योगेश काशिनाथ बोरसे (वय २९ रा. लोणी ता. जि. बऱ्हाणपूर ह.मू. बांभोरी प्र. चा. ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ मे २०२२ रोजी धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथे बुधा नन्नवरे यांच्या मालकीच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील रुममधून योगेश बोरसे व साक्षीदार दिव्यसागर गायकवाड यांचा १५ हजार रुपये किंमतीचा रिअल मी कंपनीचा मॉडेल सी-१५ पॉवर सिल्व्हर रंगाचा मोबाईल फोन, १५ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मॉडेल एम -३० एस हिरव्या रंगाचा मोबाईल फोन, असा एकूण ३० हजारांचे दोन मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत.
















