मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्यार असल्याची चर्चा सूरू झाली आहे. समोर घडत असलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्र सरकार हादरले, तर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक ३५ आमदारांसह नाराज असल्याने आसामची राजधानी गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. तेथे एका हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांचे फोटो व्हायरल झाला आहे.
राजकीय वर्तुळात वेगळेच घडामोडी सुरू असल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली आहे.. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील राजकरणात मोठ्या घडामोडीची चाहूल लागत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला होता. सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर मध्यरात्री राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या 35 आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झाले. व्हिडिओत आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी केली तर हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्याण्यासाठी असल्याचे म्हटले जात आहे. सर्व आमदारांचे फोन बंद असल्याने शिवसेनेसह त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य त्यांच्याशी संपर्क साधू शकला नाही. यावर महाराष्ट्र सरकारची प्रतिउत्तर काय असेल पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.