धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अशोक बारकु भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १८ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अशोक बारकु भिल (रा. चांदसर ता. धरणगाव) याने दारूच्या नशेत ३५ वर्षीय महिला राहत असलेल्या घरासमोर जावून मोठमोठ्याने आरडाओरड केली. तसेच अशोक याने त्याच्या अंगावरील संपूर्ण कापडे काढून निवस्त्र होवून महिलेच्या दरवाज्यासमोर उभा राहिला. त्यामुळं महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अशोक बारकु भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ हे करीत आहेत.