चोपडा (प्रतिनिधी) पतजंली योगपीठाचे नॅचरोपॅथी कोर्सचे ऑनलाईन बुकींग करुन देण्याच्या नावाखाली ३५ हजारांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रवीण आनंदराज जैन (वय ६०, रा. मेनरोड चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १ मार्च २०२२ रोजी प्रविण आनंदराज जैन व मुलगा नवीन हे चोपडा शहरातील मानस ज्वेलर्स या दुकानात असतांना पतजंली योगपीठाचे नॅचरोपॅथी कोर्सचे ऑनलाईन बुकींग करुन देतो, असे सांगुन ९००७९८५९२७ या पुरुष मोबाईल क्रमांक धारकाने त्याच्या पंजाब नॅशनल बॅक हरिद्वार ब्रांच या खात्यावर ३५००० रुपये एवढ्या रक्कमेचा ऑनलाईन पध्दतीने पैसे पाठविण्यास सांगुन ते पाठवुन देखील सदर कोर्सचे बुकिंग न देता फसवणुक केली. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास चोपडा पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहेत.
















