जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात अवघे ३९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे आज जिल्ह्यात ५३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर तब्बल दहा तालुक्यात एकही कोनाबाधित आढळून आलेला नाहीय.
जळगाव शहर –११, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ- १९ अमळनेर- ००, चोपडा-०२, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५३ हजार ५८९ पर्यंत पोहचली असून ५१ हजार ७६० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आतापर्यंत १२७२ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ५५७ रुग्ण सध्या उपचार घेताय.