जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित केला जाणारा तिसरा राष्ट्रीय युवा संसद उत्सव २०२१-२२ मार्चमध्ये होणार आहे. जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले असून नाव नोंदणीचे आवाहन युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
युवांच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवा संसद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचा राष्ट्रीय उत्सव पुढील महिन्यात पार पडणार आहे. राष्ट्रीय स्तरावर विजयी होणाऱ्या स्पर्धकांना २ लाख, १.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम लवकरच घेण्यात येणार आहे. दि.१३ फेब्रुवारी रोजी १५ ते २९ वयोगट असलेल्या स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
जिल्हास्तरीय युवा संसदेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ फेब्रुवारी आहे. स्पर्धकांना इंक्रेडीबल इंडिया, आयुष्यमान भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या विषयावर ४ मिनिटात आपले वक्तृत्व सादर करायचे आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी नेहरू युवा केंद्र, जळगाव कार्यालय, द्रौपदी नगर, मानराज पार्क याठिकाणी किंवा ०२५७-२९५१७५४ याठिकाणी संपर्क करावा. तसेच आपले अर्ज फोटो आणि वयाच्या पुराव्यासह अर्ज सादर करावे आणि https://drive.google.com/file/d/1wtIVo_-mtYXYIaVcDBHke5s0NLM4Qg0l/view?usp=sharing लिंकला क्लीक करून अर्ज भरून द्यावा, असे कळविण्यात आले आहे.