धरणगाव (प्रतिनिधी) आज प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहराचा एकुण आकडा २०७६ इतका झाला आहे.
धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात अवघे ०४ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यात मराठे गल्ली-१, आनोरे-१,नांदेड-१, पाळधी बुद्रुक-१ असे एकूण आज अवघे ०४ रूग्ण आज आढळले आहे. तालुक्यात २०७६ रूग्ण झाले असून यापैकी ४९ रूग्ण मयत झाले. तर २००८ रूग्ण बरे झाले असून उर्वरित १९ रूग्ण हे उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.