जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातील मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केला.शेताच्या बाध्यावर संशयित आरोपी सुनील आत्माराम महाजन याने हा विनयभंग केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अट्रासिटीसह विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा हे करीत आहेत.