अकोला (प्रतिनिधी) मोटारसायकल पळविणारी आंतरजिल्हा टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून त्यांनी पंचविस लाख रूपये किमतीच्या ४१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अकोला, बुलडाणा, भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यातील चोरीच्या मोटासायकलींचा छडा पोलिसांना यामध्ये लागला.
अकोला गुन्हे शाखेची धाडसी कारवाई !
पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव व पथकातील अंमलदार यांनी रामदास पेठ पोलिस ठाण्याअंतर्गत एका मोटारसायक चोरीचा तपास सुरू केला. तांत्रीक व गोपानिय माहीतीचे आधारे तपास करीत हे पोलिस पथक मुक्ताईनगर (जि.जळगाव) परीसरपर्यंत पोहोचले. येथून मेहराजशाह मुसाशाह, (वय ३२ वर्षे, रा. वरणगांव ता. भुसावळ, जि. जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसात त्याने १३ मोटारसायकली पळविल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत व पथकातील अंमलदार यांनी पोलीस स्टेशन बाळापुर एका चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत आरोपी माने त्रिलोक सोपीनाथ खंडेराव (वय २२ वर्ष राहणार वार्ड नंबर २ भिमनगर, बुलडाणा) यास उचलले. त्याने बाळापुर वाडेगांव परीसरात ब-याच चोरीच्या गाडया विक्री केल्या आहेत. अशी माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमलदार यांनी त्रिलोक सोपीनाथ खंडेराव यास ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. पातुर, बाळापुर परीसरातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी त्रिलोक सोपीनाथ खंडेराव याचेकडून मिळाल्यानंतर आरोपी याने वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण २८ मोटर सायकली जप्त केल्यात.
आंतरजिल्हा मोटारसायकल टोळीचा पर्दाफाश !
आंतरजिल्हा टोळी सक्रीय असल्याचे समोर आल्यामुळे संशयित आरोपी मेहराज शाह मुसाशाह, (रा. वरणगाव) मामे त्रिलोक सोपीनाथ (रा. वार्ड २ भिमनगर, बुलढाणा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींजवळून ४१ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किमंत अंदाजे पंचवीस लाख आहे. पोलीस स्टेशन रामदासपेठ, सिव्हील लाईन, चान्नी, बाळापुर तसेच बुलढाणा, जळगाव जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदीप घुगे, पो. नि. शंकर शेळके, कैलास भगत, मुकंद्र देशमुख, आकाश मानकर, अभिषेक पाठक, दत्तात्र ढोरे, विशाल मोरे, अब्दु यु अहमद, रवि खंडारे, अमोल पिके, संतोष दाभाडे, महेद्र मलीय, प्रशांत कमलाकर, प्रशांत लोखंडे यांनी केली.