धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार धरणगाव तालुक्यात आज ४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यातील ७ रुग्ण एकट्या धरणगाव शहरात आढळून आले आहेत. तर दुसरीकडे एकुण बाधितांचा आकडा ४२१० इतका झाला आहे.
धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात ३० रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यात धरणगाव शहर : २,
एरंडोल : २, भवरखेळा : २, पाळधी बु : ५, पाळधी खु ५, कल्याणे : ६, गारखेडा : १, बिलखेडा : २, पिंपळे : १, केल्याणे खु : ६, हिंगोणे : २, अंजनविहिरे : १, आमोदा : २, चावलखेडा : १, पष्टाणे : २, चमगांव : ५, खेडी : १, बांभोरी प्रचा : १, एकलग्न : १, रोटवद : १, तर धरणगाव शहरात तब्बल ७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात ४२५६ रूग्ण झाले असून यापैकी ५८ रूग्ण मयत झाले. तर ३९१९ रूग्ण बरे झाले असून उर्वरित २७९ रूग्ण हे उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.