भुसावळ (वृत्तसंस्था) येथील पत्रकार शेख सत्तार यांचे अल्पशा आजाराने मंगळवार रोजी दुखद निधन झाले आहे. शेख सत्तार यांना श्रध्दांजली देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल येथे बुधवाररोजी सामूहिक श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या श्रध्दांजलीकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत जोशी यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण , रोटरीक्लबचे ठाकूर आणि रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे पीआरओ निलेश वाणी यांनी श्रद्धांजलीवर मनोगत व्यक्त करून सत्तार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी भविष्यात पत्रकारांच्या कुटुंबावर अशी वेळ येउ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यासाठी सर्वानुमते सूचना देखील करण्यात आली. सत्तार यांच्या कुटूंबाच्या दुखा:त सहभागी होउन कुटुंबियांना मदत करण्याचे ठरविण्यात आले आहे. समाजाला न्यायदेण्यासाठी धदपड करणाऱ्या पत्रकारांच्या परिवाराला पाठबळ कोणाचे ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी प्रेम परदेशी, निलेश गोरे , नेवे, किशोर शिंपी, आशिष पाटील, शंतनु गचके ,उदय जोशी,उज्वला बागूल,सतीश कांबळे,संतोष शेलोडे, कलिम पायलट,गणेश वाघ आदी मुद्रण माध्यमाचे प्रतिनिधी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी श्रद्धांजली उपस्थित होते .