धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकटुकी ग्रामपंचायत कार्यालयाचे समोर रोडवर सार्वजनिक ठिकाणी मागील भांडणाच्या कारणावरून ४८ वर्षीय व्यक्तीला लाथाबुक्यांनी, लोखंडी आसारी व लाकडी दांडक्यानी मारहाण करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मधुकर अर्जुन सावंत (वय ४८, रा. वाकटुकी ता. धरणगाव ह.मु. प्लॉट नं २९, गट नं ९५ गणपती मंदिर जवळ खोटेनगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी धरणगाव तालुक्यातील वाकटुकी ग्रामपंचायत कार्यालयाचे समोर रोडवर सार्वजनिक ठिकाणी कैलास अशोक तायडे (रा. वाजोळा), गणेश ज्ञानेश्वर सावंत, राहुल ज्ञानेश्वर सावंत, दीपक नामदेव सावंत, विकास नामदेव सावंत, संदीप शंकर पाटील, गणेश धनराज पाटील (सर्व रा. वाकटुकी ता. धरणगाव) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून मधुकर सावंत यांना कैलास तायडे, गणेश सावंत, राहुल सावंत, दीपक सावंत, विकास सावंत यांनी लाथाबुक्यांनी, लोखंडी आसारी व लाकडी दांडक्यानी मारहाण करुन तु केव्हाही वाकटुकी गावात आल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली तसेच संदीप पाटील, गणेश पाटील यांनी मधुकर सावंत यांना मापण्यासाठी आरोपींना चिथावणी केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ राजेद्र कोळी करीत आहेत.