धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी बु येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने ५४ हजारांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात आरती बाबूराव पाटील (वय ३८ रा. नवीन सावदा रोड रावेर ह.मु. देवकर कॉलनी पाळधी बु ता.धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २४ मे २०२२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास देवकर कॉलनी पाळधी बु येथील राहत्या घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर किचनमध्ये ठेवलेल्या बॅगेतील ५४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत.