धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल धरणगाव येथे १९६९ ची जुनी मॅट्रिक बॅचच्या माजी विद्यार्थ्यानी गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून साडेतीन हजार रूपयांचा शाळेला परिवर्तनवादी ग्रंथांचा संच भेट म्हणून देऊन शाळेविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली.
सुमारे ७० वर्ष वय असलेले हे माजी विद्यार्थी विविध पदांवर काम करून सध्या सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. या वयातही शाळेला भेट देण्याचा त्यांचा उत्साह आणि आनंद भरभरून वाहत होता. शाळेतील जुन्या आठवणीना त्यांनी उजाळा दिला.
प्रसंगी पी.आर.हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलींद डहाळे, उपाध्यक्ष व्ही.टी.गालापुरे, सदस्य अजय पगारीया उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे यांनी या माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन ग्रंथसंपदा स्वीकारली. या बॅचचे विद्यार्थी तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा.दिगंबर कट्यारे, जळगाव व प्रभाकर अहिरराव (सेवानिवृत्त पोस्टमास्तर), सुरेश राठोड, वसंतराव पडोळ, रवींद्र भारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अनिस कार्यकर्ते प्रा.रवींद्र भदाणे, पत्रकार जितेंद्र महाजन हे अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते.