TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

६,६,६,६,६,६.! पोलार्डने युवराजच्या विक्रमाशी केली बरोबरी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अँटिग्वा (वृत्तसंस्था) भारताचा धुरंदर आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं २००७ मध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात एकाच षटकात ६ षटकार मारून इतिहास रचला होता. आता श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पोलार्डने जबरदस्त खेळ करताना सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. त्याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या युवराज सिंग च्या विक्रमाशी बरोबरी केली.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. ४१ चेंडू आणि चार गडी राखत वेस्ट इंडिजच्या संघाने सामना खिशात घातला. विंडिजकडून कायरन पोलार्डने कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. पोलार्डने अकीला धनंजयच्या एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. या पराक्रमबरोबरच पोलार्डने युवराज सिंग, हर्शल गिब्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. युवराजने टी-२० तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. पोलार्डने विंडीज संघाची फलंदाजी सुरु असतानाच पाचव्या षटकामध्येच हा पराक्रम करत विक्रमी कामगिरी केली. पोलार्डने ११ चेंडूमध्ये ३८ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-२० मधील विक्रमाची बरोबर केली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबर करण्यात यश मिळालं आहे.

READ ALSO

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

पोलार्डच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलार्ड मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरला तेव्हा वेस्ट इंडिजचे चार फलंदाज तंबूत परतले होते. लेंडल सिमन्स २६ धावा, एविन लुईस २८ धावा यांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर क्रिस गेल आणि निकोलस पूरन भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर पोलार्डने वेस्ट इंडिज संघाच्या विजय मिळवून देत तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिली सामना जिंकला. पोलार्डने सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याची कामगिरी करत क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तिसरा खेळाडू होण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केलाय. यापूर्वी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने २००७ च्या आयसीसी वर्ल्ड टी-२० मध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकामध्ये सलग सहा षटकार लगावले होते. युवराजच्या आधी दक्षिण आफ्रीकेचा नावजलेला फलंदाज हर्षल गिब्सने त्याच वर्षी म्हणजेच २००७ साली एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. गिब्सने नेदरलॅण्डविरोधातील सामन्यामध्ये डान वैन बुंगेच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सहा षटकार लगावले होते. सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावणारा पोलार्ड हा पहिलाच वेस्ट इंडियन खेळाडू ठरलाय.

याआधी आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी फक्त दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्स आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं केली होती. यानंतर पोलार्डनं कारनामा करणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. आता या यादीत वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डचं नाव नोंदवल गेलं आहे. आयसीसीने ट्वीट करत याची अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. वेस्ट इंडिजच्या संघाने १३.१ षटकांमध्येच सहा गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करत सामना चार गाडी राखून जिंकला. या मालिकेतील पुढचा सामना ६ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
Next Post

सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही : सुप्रीम कोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Neal Browning receives a shot in the first-stage safety study clinical trial of a potential vaccine for COVID-19, the disease caused by the new coronavirus, Monday, March 16, 2020, at the Kaiser Permanente Washington Health Research Institute in Seattle. Browning is the second patient to receive the shot in the study. (AP Photo/Ted S. Warren)

देशभरात आजपासून लसीकरण; राज्यात पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

January 16, 2021

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी ५० टक्के माफीची संधी येत्या मार्चपर्यंत

February 23, 2022

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : दुसऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

December 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group