जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा कॅरम असो. च्या मान्यतेने व जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना द्वारे आयोजित ७ व्या कै. अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या नईम अन्सारी याने तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर च्या रईस शेख याचा २–० सेटने पराभव करून विजेतेपदासह रोख रुपये ५००१/– व चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले.
रईस शेख यास रोख रुपये ३००१/– व चषक बक्षिस मिळाले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोशन शेख रोख रुपये २००१/– व चषक आणि चतुर्थ रोख रुपये १५०१/– व चषक अय्यूब खान याने प्राप्त केले. क्रमांक ५ ते ८ चे प्रत्येकी रोख रुपये १००१/– चे पारितोषिक अनुक्रमे आवेज शेख ( प्लाझा क्रीडा संस्था), शेख हबीब ( एकता क्रीडा मंडळ), सैय्यद मुबश्शीर ( प्लाझा) व सैय्यद मोहसिन ( जैन स्पोर्टस् अकॅडमी ) यांनी प्राप्त केले.
स्पर्धेतील एकमेव ओपन टू फिनिश ची नोंद जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या परेश देशपांडे यांनी केली. बक्षिस वितरण कार्यक्रमा करिता सर्वश्री ॲड. रविंद्र कुलकर्णी, युसूफ भाई मकरा, सुयश बुरकुल, रोहित श्याम कोगटा, शरीफ खान व इतर मान्यवर उपस्थितीत होते. पाहुण्यांचे स्वागत सर्वश्री सैय्यद मोहसिन, शेख हबीब, मोहम्मद फजल, नासिर खान व आताऊल्लाह खान यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचे आभार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान यांनी केले.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून आयशा खान, चंद्रशेखर नरवरिया आणि सरफराजुल हक यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेत जळगाव जिल्हाभरातून एकूण ४८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
शिव छत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यांचे विशेष सत्कार
या प्रसंगी नुकताच २०२३–२४ सालाकरिता जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास महाराष्ट्र सरकार तर्फे श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( कॅरम खेळाडू) म्हणून प्राप्त झाले. त्या बद्दल त्यांचे विशेष सत्कार सर्व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील अंतिम निकाल
विजेता – नईम अन्सारी ( जैन इरिगेशन)
उपविजेता – रईस शेख ( तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर)
३ रा क्रमांक – रोशन शेख (तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर)
४था क्रमांक – अय्यूब खान ( तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर)
५वा क्रमांक – आवेज शेख (प्लाझा क्रीडा संस्था)
६ वा क्रमांक – हबीब शेख (एकता क्रीडा मंडळ)
७ वा क्रमांक – सैय्यद मुबश्शीर (प्लाझा क्रीडा संस्था)
८ वा क्रमांक – सैय्यद मोहसिन (जैन स्पोर्ट्स अकॅडमी).