जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी आणि कृषिउद्योजकांच्या पुढच्या पिढीला चालना देण्यासाठी फाली औद्योगिक जगतातील नायकांना एकत्रित आणत आहे. त्यासाठी जैन हिल्स येथे फालीचे आठवे संम्मेलन आयोजित करण्यात आलेले आहे. हे संम्मेलन १ व २ तसेच ४ व ५ जून या दिवशी दोन भागात घेतले जाईल. या संम्मेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील १३५ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांमधून ८०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. फालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे.
आधुनिक शेती, कृषी व्यवसाय तसेच ग्रामीण विकास ह्या क्षेत्रात कार्यरत असलेले त्यासोबत उच्च शिक्षण घेणाऱ्या सहा फालीच्या माजी विद्यार्थ्यांची यासाठी खास उपस्थित असेल. फाली शाळांमधील संवादात्मक शिक्षण, प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी, वेबिनार, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा या सर्वांसाठी जबाबदार असलेले ७० हून अधिक ए. ई. (अॅग्रिकल्चर एज्युकेटर) जे बी.एस्सी आणि एम.एस्सी कृषि पदविधर आहेत. त्यांचीही याठिकाणी उपस्थिती असेल. फाली ९ व त्यानंतर फालीला ज्या कंपन्या पुरस्कृत करतील अशा कंपन्या आणि बँकांचे ज्येष्ठ व्यवस्थापक आणि ३० हून अधिक प्रतिनिधीसुद्धा यात उपस्थित राहतील. सध्या जैन इरिगेशन, गोदरेज अॅग्रोव्हेट, यूपीएल, स्टार अॅग्री आणि ओम्निव्होर या कंपन्या फालीला पुरस्कृत करतात. जैन इरिगेशन फालीच्या आठव्या संम्मेलनाचे यजमान आहेत. भविष्यात फालीला प्रायोजित करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा रॅलीज, महिंद्रा, आइटीसी, अमूल आणि दीपक फर्टिलायझर यांचा समावेश आहे.
फालीचा गेल्या आठ वर्षातील प्रभाव – संवादात्मक शिक्षण, क्षेत्रभेटी, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा, आधुनिक शेती आणि कृषितील व्यावसायिक ज्ञान याद्वारे फाली हा एक अद्वितीय आणि अतिप्रभावशील कार्यक्रम म्हणून संस्थापित झालेला आहे. जो नवीन पिढीला शेतीक्षेत्राकडे आकर्षित करत आहे. फालीची अनुभवी टीम, ए.ई. इ. ८ वी, ९ वीच्या विद्यार्थ्यांना परस्पर संवाद आणि प्रात्यक्षिके या द्वारे आधुनिक आणि शाश्वत शेती, कृषिउद्योग, यांचे शिक्षण देतात. अधिक माहिती युट्युबवर https://youtu.be/4IbrCqYfOHw या लिंकवर पाहता येईल.
फालीमुळे उदरनिर्वाहासाठी असलेली शेतीकडे उत्तम करियर म्हणून बघितले जात आहे. फालीमधील विद्यार्थी आणि पालकांच्या विचारसरणीमध्ये सकारात्मक बदल घडवित आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीपद्धती त्यांच्या कौटुंबिक शेतीत वापरायला सुरवात केलेली आहे. यामुळे पालकांना आधुनिकतेसह शाश्वत शेती आणि त्यातून कृषिव्यवसायाचा समृद्ध मार्ग सापडला आहे फालीचे हेच मूल्यांकन आहे.
फाली उपक्रम विस्तार योजना
२० मे २०२२ रोजी कंपनी कायद्यातल्या ८ व्या कलमानुसार जानेवारी २०२१ मध्ये स्थापित असोसिएशन फॉर फालीच्या संचालक मंडळाने फाली उपक्रम विस्ताराच्या नियोजनाला मंजुरी दिली आहे. फालीच्या संचालक मंडळात कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये नादीर गोदरेज (अध्यक्ष फाली व गोदरेज ग्रुप), रजनिकांत श्रॉफ अध्यक्ष यूपीएल, अनिल जैन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन, नॅन्सी बेरी – उपाध्यक्ष असोसिएशन फॉर फाली. फाली उपक्रमाचा विस्तार २५ टक्के प्रती वर्ष या वेगाने केला जाईल. पुढील सहा वर्षात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात सध्याच्या कंपन्यांच्या, बँकांच्या आणि फाऊंडेशनच्या निधीच्या पाठिंब्याने करायला फालीच्या संचालक मंडळाने मंजूरी दिली आहे. अशा वेगाने फाली उपक्रम २०३१ पर्यंत आठवी आणि नववीच्या एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल.
भारताच्या शेतीतील भविष्याचे प्रगतीशील नायक म्हणून अडीच (२५,०००) लाख फाली नायक तयार होतील. जे विद्यार्थी कृषी किंवा शास्त्र विषयातील उच्च शिक्षण घेत असतील, कृषी व कृषीपुरक क्षेत्रात कार्यरत आहेत अशा माजी फाली विदयार्थ्यांना इंटरशिप म्हणून, शिष्यवृत्ती आणि कृषि व्यवसायासाठी प्रारंभीक निधी पुरविण्याच्या कार्यक्रमाला संचालकांनी मान्यता दिली आहे. हा कार्यक्रम इ. ८ वी व ९ वीतील विद्यार्थ्यासोबत फाली अभ्यासाला बळकटीकरण देईल आणि फाली आयुष्यभर विद्यार्थ्यांसोबत राहील.
फाली उपक्रमाला विदयार्थी आणि त्यांच्या पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खूप फाली विदयार्थ्यांनी त्यांच्या कुटंबातील शेतीत सुधारणा केली आहे. यामध्ये जास्त उत्पन्न मिळणारी नगदी पिके लागवड, उत्तम जातींच्या पशुंचे पालन आणि माती परीक्षण व दूध परीक्षण यासारख्या आधुनिक पद्धती स्वीकारल्या आहेत. फाली उपक्रमाच्या मूल्यांकनामध्ये दिसून आल्याप्रमाणे ९० टक्के विदयार्थ्यी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेती आणि कृषी व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी सुसज्ज आहेत. तसेच ९० टक्के फाली विदयार्थी उच्च शिक्षण घेणार आहेत. तसेच ४५ टक्के माजी फाली विदयार्थी सध्या शिक्षणासोबत शेती क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जवळजवळ ८०० फाली माजी विद्यार्थ्यांनी कृषी व्यवसाय सुरू केले आहेत.
फाली संमेलनामध्ये विद्यार्थी फळबागेच्या लागवड पद्धती, शिवारफेरी, टिश्यूकल्चर, सोलर पार्क, बायोपार्क, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, आर अॅण्ड डी, सिंचन प्रकल्प, गांधीतिर्थ यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतील. प्रगतीशील शेतकऱ्यांबरोबर जैन हिल्सवर सुसंंवाद साधतील. फाली विद्यार्थ्यांचे गट त्यांचे कृषि व्यवसाय योजना आणि इन्होवेशन मॉडल्स सादर करतील. यातील विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. यावेळी फाली उपक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतील. यामध्ये २ जून ला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, यूपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ अध्यक्षीय भाषण करतील. तर जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन यावेळी मनोगत व्यक्त करतील. ५ जून ला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे बुर्जीस गोदरेज यांचे मुख्य भाषण होईल.
फाली संम्मेलनाच्या अधिक माहितीसाठी, संपर्क करा
सुप्रित सुधाकरन
मोबाईलः 9920584295; Supreeth.sudhakaran@godrejinds.com