नाशिक (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत ९ लाख ३३ हजार २७८ रुग्णांपैकी ९ लाख ०६ हजार ८९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ७ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात १८ हजार ९५४ रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१७ टक्के आहे, तर मृत्युदर २.०३ टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ५६ लाख १८ हजार १२७ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ९ लाख ३३ हजार २७८ अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ०२ हजार ८२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ लाख ९३ हजार २२९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार ७२ रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के इतके आहे. आजपर्यंत ८ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे .
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८६ टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख १ हजार ७१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ लाख ८९ हजार २५२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार २२४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८६ टक्के इतका आहे. आजपर्यंत ६ हजार २३८ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.०६ टक्के आहे.
धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४१ टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ४५ हजार ७९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५ हजार ६६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ०४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४१ टक्के इतके आहे. आजपर्यंत ६६८ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.४५ टक्के आहे.
जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ३९ हजार ९७० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के इतका आहे. आजपर्यंत २ हजार ५७५ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८० टक्के आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार ३३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९ हजार ३७७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के इतके आहे. आजपर्यंत ९५० रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.३५ टक्के आहे.