TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोरखेडा ग्रा.प. ‘त्या’ कामाबाबत म्हणणे सादर करा ; हायकोर्टाचे जिल्हा परिषदला आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2021
in कोर्ट, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा ग्रामपंचायतच्या आखत्यारितील शाळेच्या तीन खोल्यांच्या बांधकामाची ई-निविदा काढण्यात याव्यात, असा निकाल जिल्हा परिषदने दिला होता. या आदेशाच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी थेट औरंगाबाद हायकोर्टात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी होऊन दोन आठवड्यात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने जळगाव जिल्हा परिषदला दिले आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतींना स्वयत्तता प्रदान करण्यासाठी तसेच ग्रामपंचातींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी अनेक शासन निर्णय काढले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सदर शासन निर्णयांअन्वये ग्रामपंचायत आखत्यारितील १५ लाखापर्यंतची सर्वच विकास कामे प्रदान करताना स्थानिक ग्रामपंचायतीस प्राधान्य देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते. असा आदेश असताना देखील धरणगाव तालुक्यातील बोरखेडा ग्रामपंचायत आखत्यारितील ३ शाळा खोल्या बांधकामाची विकास कामे राजकीय दबावामुळे बोरखेडा ग्रामपंचायतीस नाकारण्यात आल्याचा आरोप होता.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

स्थानिक जिल्हा परिषद सदस्य गोपाळ घनश्याम चौधरी यांनी सदर विकास कामे ग्रामपंचायतीस देण्यात येऊ नये किंबहुना त्यांच्या मर्जीतील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास देण्यात यावीत, या आशयाचा पत्रव्यवहार व पाठपुरावा जिल्हा परिषदेस केला होता, असा आरोप देखील विरोधी पक्षांनी केला होता.

राजकीय दबावाला बळी पडत जळगाव जिल्हा परिषदने तिन्ही विकास कामे स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांच्या मर्जीतील लोकांना प्रदान करण्यासाठी शिफारसी दिल्या होत्या, असे कळते. सदर क्रिया ही कायदा संमत नसल्याने बोरखेडा ग्रामपंचायतीने आंदोलनाचा इशारा देत उपोषणास बसण्याचा इरादा जिल्हा परिषदेस व्यक्त केल्यानंतर सदर शिफारसी तातपुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या.

बोरखेडा ग्रामपंचायत सदस्यांचे तीव्र आंदोलन पाहता जिल्हा परिषदेने सदर प्रकरणात दि. १२ जुलै २०२१ रोजी सुनावणी घेतली होती. आश्चर्याची बाब म्हणजे आक्षेपकर्ता जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी सदर सुनावणीस गैरहजर असून देखील दि. २२ जुलै २०२१ रोजी सदर सुनावणीचा निकाल ग्रामपंचायत बोरखेडा ह्यांच्या विरोधात देण्यात आला होता, असाही आरोप होत आहे.

बोरखेडा प्राथमिक शाळेतील ३ शाळा खोल्या बांधकाम संदर्भातील विकास कामांच्या ई-निविदा काढण्यात याव्यात, असा बेकायदेशीर निकाल जळगाव जिल्हा परिषद ने दिला होता , असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला होता.

त्यामुळं या आदेशाने व्यथित होऊन बोरखेडा ग्रामपंचायत सदस्यांनी सदरची लढाई पुढे नेण्याचे ठरवत थेट औरंगाबाद हायकोर्टात जिल्हा परिषदेच्या निकालाला आवाहन देण्याचे ठरवले. त्यानुसार रिट याचिका दाखल करण्यात आली. दि. ३ ऑगस्ट २०२१ रोजी औरंगाबाद हायकोर्टात सदरील रिट याचिकेवर विस्तृत सुनावणी होऊन जळगाव जिल्हा परिषदेस नोटीसा काढण्यात आल्या व दोन आठवड्यात आपले म्हणणे मांडण्यास आदेशीत करण्यात आल्याचे कळते.

महत्वाचे म्हणजे मधल्या दोन आठवड्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेकडून सदरील विकास कामाच्या ई-निविदे बाबतीत कुठल्याही प्रकारच्या हालचाली झाल्यास त्वरित आगाऊ सुनावणीसाठी विनंती करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना देण्यात आलेली आहे. रिट याचिकेत ग्रामपंचायत बोरखेडा यांच्यावतीने अँड. जितेंद्र विजय पाटील हे काम बघत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
Next Post

'५० टक्क्यांच्या मर्यादेसह १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी' : अशोक चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेंट्रल व्हिस्टाचं बांधकाम थांबविण्यासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने केली रद्द

May 31, 2021

अमळनेरच्या जि.एस.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नियोजनपूर्व बैठक उत्साहात !

August 7, 2022

सुवर्णसंधी ! या आठवड्यात ‘या’ बँकांमध्ये होणार बंपर भरती ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

February 12, 2022

माधवबागतर्फे ‘विजयोत्सव आरोग्याचा २०२२’ कार्यक्रमाचे आयोजन !

September 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group