TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

रब्बी पिकांचे नुकसान; मका, ज्वारी जमीनदोस्त; शेतकरी चिंतेत

vijay waghmare by vijay waghmare
March 31, 2026
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यात अवकाळी पावसाने सोमवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावत अनेक भागांत जनजीवन विस्कळीत केले.सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जळगाव शहरासह तालुक्यातील आव्हाणे, भादली, ममुराबाद, असोदा येथे गारांचा वर्षाव झाला. तसेच पाळधीसह पाचोरा तालुक्यात गारपीटीने झोडपले.त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

चाळीसगाव येथे सायंकाळी सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वेगवान वारे वाहत होते. पारोळा, बहादरपूर परिसरात सव्वापाचच्या सुमारास पावसाची सुरुवात झाली. अमळनेर, धरणगाव आणि जामनेर तालुक्यांतही सायंकाळच्या वेळेत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची नोंद झाली. धरणगाव व पाचोरा तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट झाली आहे. जामनेर तालुक्यातील नेरीसह लोहारा, बाळद, कजगाव परिसरातही वादळी पावसाने झोडपले.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

रावेर तालुक्यातील तांदलवाडी परिसरात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तुलनेने कमी होता. शेंदुर्णी परिसरातही पावसाची नोंद झाली आहे.या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी वादळीवाऱ्यामुळे झाडे व विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यात सकाळी कडक उन्ह होते. मात्र, दुपारी तीननंतर हवामानात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. जळगाव शहरात सायंकाळी पाचला जोरदार पाऊस झाला. सुरवातील काही मिनिटे गारांचा पाऊस पडल्यामुळे नागरिकांची गोंधळ उडाला. अचानक झालेल्या गारांसह पावसामुळे मोटारसायकल घसरल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाळ्यापासून दिलासा मिळाला.

मका, ज्वारीचे मोठे नुकसान

पारोळा, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात वादळामुळे ज्वारी व मका उत्पादकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. वादळामुळे काढणीला आलेले बहुतांशी पिके आडवी झाल्याने उत्पादक घट होणार असून, काढणीचा खर्च वाढणार असल्यामुळे शेतकरी अडचणी आला आहे. आज पुन्हा अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.

आजही पावसासह गारपीटचा इशारा

हवामान विभागाने पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस, गारपीट आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असली तरी ढगाळ वातावरण कायम राहणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तसेच १ ते ४ एप्रिल दरम्यानही पावसाचा अंदाज असल्याने दुपारनंतर पावसासह काही ठिकाणी गारपिटीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे : गर्भपातानंतर तरूणीचा मृत्यू ; तरूणासह डॉक्टराविरुद्ध गुन्हा !

August 27, 2023

नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका ; शिंदे-फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा लावली कामाला

August 19, 2022

महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही, पण इथं बंगालची शेरनी बसलीय याद राखा ; ममता बॅनर्जींचा भाजपाला इशारा !

July 25, 2022

विवाहित असूनही घटस्फोटीत महिलेशी लग्न करून उकळले ६ लाख !

August 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group