TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका ; शिंदे-फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा लावली कामाला

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई ( वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपासोबत आपला नवा संसार सुरु केल्यानंतर कॅबिनेट मंत्री पदासाठी मोठी रस्सीखेच झाल्यानंतर अनेक आमदार नाराज झाले होते, आता या नाराज आमदारांच्या हालचाली पुन्हा वाढल्या असून त्यांच्या आपापसांत बैठका होत आहेत. मात्र, सतर्क शिंदे-फडणवीसांनी हा धोका ओळखून नाराज आमदारांच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून वॉच ठेवला जात आहे.

या नाराज आमदारांवर गुप्तचर विभागाकडून दिवस-रात्र पाळत ठेवण्यात येत आहे. हे नाराज आमदार दगा-फटका करण्याची भीती सत्ताधारी मंडळींना आहे, त्यातूनच सरकारने हे पाऊल उचलेले आहे. हे आमदार कुठे जातात, कुणाला भेटतात, कितीवेळ आणि किता वेळा भेटतात, याची नोंदी ठेवल्या जात आहेत. या आमदारांच्या बैठका कुठे होत आहेत, हेही पाहिले जात आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला खिंडार पाडले होते. हे सर्व आमदार आपल्या मंत्रीपद किंवा काही तरी आपल्या पदरात पडेल, या आशेने बंडात सामील झाले आहेत. मात्र, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात शिंदे गटाच्या केवळ ९ जणांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे या चाळीस आमदारांमधील अनेकजण नाराज झाले आहेत. त्याची झलक मंत्रिमंडळ विस्तारानंतर अख्ख्या राज्याला पहायला मिळाली आहे.

पहिल्या विस्तारात अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांची नावे नव्हती. ही गोष्ट समजल्यानंतर या दोघांनी एकनाथ शिंदे यांच्यापुढेच आक्रमक पावित्रा घेतला. त्यांच्या आक्रमकतेपुढे अखेर शिंदे यांनी नमते घेत दोघांना पहिल्याच विस्तारात सामावून घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, मंत्रिपदाचे दावेदार आमदार संजय शिरसाट यांचे नाव अखेरच्या क्षणी कापले गेले, त्यामुळे शिरसाट हे भलतेच संतापले होते. त्यांनी कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा डीपीही आपल्या फेसबुक पेजवर ठेवला होता. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उदय सामंत आणि इतरांनी शिरसाट यांची समजूत घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.

आमदार भरत गोगावले हेही मंत्रिमद न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगितले जात आहे. बच्चू कडू यांनी तर मंत्रिपद हा आमचा हक्क आहे, असे सांगून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुःखी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण हेच बंडखोर आमदार मंत्रिपद न मिळाल्याने आपापसात बैठका घेत असल्याचे पुढे आले आहे. मात्र, राजकीय डावपेचात माहीर असलेले फडणवीस यांनी अगोदरपासूनच या नाराजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर विभागाला कामाला लावले आहे. या सर्व आमदारांवर राज्य सरकारकडून नजर ठेवण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात आर्थिक अनियमितता, संचालकांवर कारवाईचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना उपाययोजनांसाठीच्या निधीत गैरव्यवहार ; आ.चिमणराव पाटील यांच्या आरोपानंतर खळबळ !

January 14, 2022

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

April 18, 2026

कर्मभूमी रावेर श्रीराम पाटील यांच्या पाठीशी : प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

May 10, 2024

कोलकातामधील भाजप कार्यालयाजवळ आढळले ५१ क्रुड बॉम्ब !

June 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group