बोदवड (प्रतिनिधी) शहरातील शिवद्वार जवळ राहत असलेल्या एका 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. रुपेश मुरलीधर माळी (वय २२), असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, दि. २० नोव्हेबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रुपेश माळी याने रात्री ११ वाजेच्या सुमारास भाड्याने राहत असलेल्या घरातील छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला उपचाराकामी गावातील लोकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मयताचा भाऊ दिपक मुरलीधर माळी यांच्या खबरीवरून बोदवड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रुपेशचे आई-वडील तो लहान असतांना 12 वर्षापूर्वी मयत झाले होते. मोठा भाऊ दिपक व रुपेश हे दोघे भाऊ आपला कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करत होते. पुढील तपास सहाय्यक फौजदार शेजोळे करीत आहे.