धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चिंतामणी मोरया परिसरात आज सकाळी एक बंद घर चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसात या परिसरातील ही तिसरी चोरी आहे.
या संदभार्त अधिक असे की, शहरातील चिंतामणी मोरया परिसरातील जुन्या मुकबधीर शाळेजवळ राहणारे दिलीप संचेती यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे निदर्शनास आले. संचेती बाहेरगावी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराला लक्ष केले आहे. घरातील सर्व सामान अस्तव्यस्त फेकलेला आहे. दरम्यान, संचेती हे घरी पोहोचल्यानंतरच नेमकं काय-काय चोरीला गेलं आहे?, याबाबतची माहिती मिळू शकणार आहे. मागील काही दिवसात या परिसरातील ही तिसरी चोरी असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, चिंतामणी मोरया परिसरात काल रात्री आणखी एक घर फोडल्याची माहिती समोर येत आहे.