TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील जैन गल्लीत बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोनाराचे दुकान फुटण्यापासून वाचले ; पोलिसांकडून चोरट्यांचा अंधारात केला सिनेस्टाईल पाठलाग !

vijay waghmare by vijay waghmare
August 18, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जैन गल्लीत चोरट्याने बंद घर फोडल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर सोनाराच्या दुकानात चोरीसाठी सलूनचे दुकानही फोडले. परंतू घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्यामुळे चोरट्यांचा सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला.

शहरातील जैन गल्लीत विवेक लाड हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. काही कामनिमित्त दोन दिवसापूर्वी ते मुंबई येथे गेले आहेत. घर बंद असल्याची संधी साधत पहाटे ४ वाजेच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामान अस्तव्यस्त करत दागिने आणि रोकड शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, लाड हे बाहेरगावी असल्यामुळे घरातून नेमकी किती रक्कम व ऐवज चोरीस गेला, हे श्री. लाड हे धरणगावात परत आल्यावरच समजू शकणार आहे.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दरम्यान, याच अज्ञात चोरट्यांनी जैन गल्लीतील विजय झुंजारराव यांचे सलूनचे दुकान फोडून त्यामार्गे सराफाचे दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास जैन गल्लीतील सुयश डहाळे यांनी चोरट्यांना बघितले. त्यांनी तात्काळ धरणगाव पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय एस.के. पवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत जैन गल्लीत पोहचले. पोलिसांना बघताच चोरट्यांनी पळ काढला. पीएसआय पवार यांनी सुभाष मराठे आणि मोहसीन खान या आपल्या सहकाऱ्यांसोबत चोरट्यांचा गल्ली बोळातून सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे सोनवद रोडच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झालेत.

गेल्या काही महिन्यांपासून जैन गल्ली परिसरात बंद घर फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागिकांमधून होत आहे. दरम्यान, चोरटा फरार होण्यापूर्वी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांना तपासात मदत होणार आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनेची गांभीर्यांनी दखल घेतली असून सराफ व्यावसायिक बांधवांची आज तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChoridharangaon

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य रविवार १८ ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी

December 13, 2020

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 डिसेंबर 2023 !

December 8, 2023

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नितीन गडकरींची भेट ; विविध विषयांवर चर्चा !

December 31, 2020

छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा ; अँड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन

June 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group