धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात दारूच्या नशेत एकाने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आरोपी विकास काशिनाथ पाटील याने पिडीत महिलेला दारूच्या नशेत शिविगाळ करून त्याच्या हातातील दगड पिडीतेच्या डोक्यात मारून दुखापत केली. तसेच हात पकडून छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व पुन्हा मारहाण करून शिविगाळ केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात भादवि कलम ३५४ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. करीम सैय्यद हे करीत आहेत.