जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कडगाव जवळील रोडवर जाणाऱ्या डंपरला दगड मारून चालकासह सहकाऱ्याला बेदम मारहाण करत खिश्यातील २ हजार ७०० रूपयांची रोकड आणि फोन-पे मधून ५ हजार असे एकुण ७ हजार ७०० रूपये जबरी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात
ज्ञानेश्वर चिंधु सोनवणे वय २९ रा. भातखेडाा ता.भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनउु वाजेच्या सुमारास त्याचा सहकारी गंगाराम दळवी यांच्यासोबत डंपरने जळगाव तालुक्यातील कडगाव येथून जात असतांना संशयित आरोपी कमलाकर सपकाळे आणि राजेंद्र कोळी दोन्ही राहणार कडगाव ता.जळगाव या दोघांनी डंपरवर दगड मारून थांबविले, त्यानंतर चालक ज्ञाानेश्वर सोनवणे आणि त्यांचे सहकारी गंगाराम दळवी यांना मारहाण केली. तर ज्ञानेश्वर यांच्या खिशातील २ हजार ७०० रूपये आणि फोन पे वरून ५ हजार ट्रान्सफर करून घेतले. ही घटना घडल्यानंतर चालक ज्ञानश्वर सोनवणे यांनी नशिराबाद पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कमलाकर सपकाळे आणि राजेंद्र कोळी दोन्ही राहणार कडगाव ता.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.
















