धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चिंतामण मोरया परिसरातील बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी २५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात भाग्यश्री गोकुल नन्नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बेडरुममध्ये असलेला पत्र्याच्या कपाटातील लॉकरमध्ये स्टिलच्या डब्यात असलेले १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी मंगलसुत्र, ५०० रुपये किंमतीचे चांदिचा साकळ्या एक जोड व चांदिचे जोडवे एक जोड तसेच १० हजाराची रोकड असा एकून २५ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ जे.डी. पाटील हे करीत आहेत.