नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात फेस्टिव सेल दरम्यात ७ दिवसात पुन्हा एकदा स्मार्टफोन्सने बाजी मारली आहे. शॉपिंग कॅटेगरीत सर्वात जास्त स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. तसेच एकूण फेस्टिव सेलचे ४७ टक्के शेयर मिळवले आहे. याचे सर्व श्रेय नवीन लाँच आणि स्वस्त किंमतीतील स्मार्टफोन्स मॉडल आहेत.
बेंगळुरूच्या मार्केट रिसर्च फर्मच्या माहितीनुसार, फेस्टिव सेलच्या आधीच्या आठवड्यात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रत्येक मिनिटाला १.५ कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री झाल्यामुळे ऑनलाईन फेस्टिव्ह सेलमध्ये नवा रेकॉर्ड बनला आहे. याचे कारण म्हणजे व्हॅल्यू सिलेक्शन आणि अफोर्डेबिलिटी स्कीम आणि फास्ट डिलिवरी आहे. रेडसीर कॉन्सुलटिंग चे डायरेक्टर यांनी सांगितले की, अनेक कारणामुळे भारतीय ई-कॉमर्ससाठी फेस्टिव्हल आहे. याची फ्यूचर ग्रोथ आणखी मजबूत बनवता येणार आहे. गेल्या वर्षी फेस्टिव सेलमध्ये फॅशनचे खूप मोठे योगदान राहिले नव्हते. पण यावर्षी फॅशनचा १४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर फॉर्मल आणि फेस्टिव वियरची मागणी अद्यापही कमी आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, होम आणि होम फर्निशिंग यासारख्या कॅटगरीजच्या मागणीत वर्क फ्रॉम होम आणि स्टडी फ्रॉम होम इन्फ्रास्टक्चर असल्याने यात खूप मोठी वाढ पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात कंपनीने ने माहिती दिली होती.
कंपनीने अँमेझॉन, फ्लिपकार्ट, प्लॅटफ्रॉमवर ७ दिवसांत फेस्टिव सेल दरम्यान ५० लाख हँडसेट्सची विक्री झाली आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँड पोकोने फ्लिपकार्टवर फेस्टिव सेलमध्ये १० लाखांहून जास्त स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये स्मार्टफोन्सने ३.२ पट अधिक वाढीची नोंद केली आहे. यात अँपल, गुगल आणि सॅमसंगचा मोठा सहभाग आहे.