धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील धानोरा ते पष्टाणे दरम्यान, फाट्याजवळ रोडवर अज्ञात दुचाकीने दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना दि. २४ मार्च रोजी घडली.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील पष्टाणे येथे शरद दिलीप पाटील (वय ३५ वर्ष, व्यवसाय शेती) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दि. २४ मार्च रोजी ते आपली मोटर सायकल (क्र.GJ ०५ FN २७८०) हिने धानोरा येथून पष्टाने येथे जात होते. त्याचवेळी फाट्याजवळ समोरुन येणारी अज्ञात मोटर सायकवरील चालकाने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन चालवुन, भरधाव वेगात चालवीत आणून शरद पाटील यांच्या मोटर सायकलीस समोरुन धडक दिली. या अपघातात शरद पाटील यांच्या तोंडावर गंभीर दुखापती झाली. अपघातानंतर अज्ञात दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ प्रदिप पवार हे करीत आहेत.