चोपडा (प्रतिनिधी) विविध समस्यांसंदर्भात आज चोपडा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यां निवेदन देण्यात आले. एवढेच नव्हे तर समस्या न सुटल्यास मोर्चा काढण्याचा ईशारा देखील पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शहरातील प्रमुख रस्ते त्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर गोल मंदिर पर्यंत मेन रोड, ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक, राणी लक्ष्मीबाई चौक ते थाळनेर दरवाजा, आझाद चौक ते बोहरा गल्ली यासह अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अक्षरशा या रस्त्यांची चाळण झालेलीअसून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?, अशी स्थिती रस्त्यांची झालेली आहे. म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. खराब रस्त्यांमुळे मणक्यांमध्ये गॅप निर्माण होऊन पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, खांदे दुखणे यासारखे आजार जडलेले आहेत. म्हणून चांगले रस्ते देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. डांबरिकरणातून ही हे रस्ते दुरुस्त करता येतील, अशा आशयाचे निवेदन चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस तर्फे माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान यांना दिनांक १२.०३.२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात देण्यात आले.
चोपडा शहरात भटके कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या भटक्या कुत्र्यांना त्वचेचे आजारही झालेले आहेत. म्हणून या कुत्र्यांच्या त्वचेवरील जिवाणू किंवा विषाणू हे मानवाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवासही त्वचेचे आजार किंवा इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे, म्हणून या भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. चौका चौकात आणि गल्लोगल्लीत मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यवर्ती भागात बसलेले दिसून येतात. तसेच हे मोकाट जनावरे जिथे बसलेले असतात त्याच परिसरात मल(शेण) टाकतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. म्हणून मोकाट जनावरांचा ही बंदोबस्त करण्यात यावा. मोकाट जनावरांच्या मालकांना याबाबत तुमची जनावरे दावणीला बांधण्यात यावी अशा सूचना देऊन मोकाट जनावरांची शहरातील संख्या कमी करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे, माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर, रमेश एकनाथ शिंदे,मधुकर विठ्ठल पाटील, डॉ.अशोकराव कदम, मंगेश भोईटे,देविदास सोनवणे, किशोर पाटील, अकबर पिंजारी, सोहम सोनवणे, गौतम छाजेड, मोहन देवराम पाटील, प्रतापराव सोनवणे, धनंजय पाटील, विलास दारुंटे, देविदास पारधी, बाळकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, अशोक साळुंखे, हाजी महमूद तेली, लक्ष्मण काविरे,दत्तात्रय साळुंखे, सतीश पाटील यांचे सह शेकडो काँग्रेसचे चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदन देताना परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान हे भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्याशी बोलताना म्हटले की, आचारसंहितेचा अडथळा होत नसेल तर सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील.