चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील आण्णाभाऊ साठे जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या एका १७ वर्षीय तरूणाचा पोहत असताना अचानपणे मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील चिंचखेडे येथील अमन मनोहर निकम (वय १७) हा तरूण शहरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरातील आण्णाभाऊ साठे जलतरण तलाव येथे तो पोहण्यासाठी गेला होता. उन्हातून आल्यानंतर कपडे काढून अमर याने ७ फुट पाण्यात उडी मारली. अमनला पोहोता येत होते. परंतु, उन्हातून थेट पाण्यात गेल्यामुळे अचानक शारिरीक बदल होवून अमरला झटके आले आणि तो पाण्यातून वर आलाच नाही.
दरम्यान, तत्काळ संरक्षकांनी अमन निकमला वर काढून शहरातील डॉ. राहूल वाघ यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पुढे त्याला शासकिय रूग्णालय ट्रामा केअर सेंटर येथे नेण्यात आले. दरम्यान, अमनच्या आईचे निधन झाले असून वडील रिक्षा चालवतात. या घटनेची माहिती मिळताच अमनच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव गाठत मोठा आक्रोश केला.