वाशिम (वृत्तसंस्था) आपला चौक सोडून दुसऱ्या चौकात वसुली करीत असल्याने संतप्त झालेल्या इतर तृतीपंथीयांनी एका तृतीयपंथीस भर चौकात विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. वाशिम शहरात आज तृतीयपंथीयांचा आपसात राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
वाशिम शहरातील एक तृतीयपंथी आपला चौक सोडून दुसऱ्या चौकात वसुली करीत असल्याने संतप्त झालेल्या इतर तृतीपंथीयांनी आजूबाजूच्या जिल्ह्यातील आपल्या सहकाऱ्यांना बोलावून आज एका तृतीपंथीस विवस्त्र करून बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाण झालेला तृतीय पंथी वाशिम शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी आली असता, इतर तृतीय पंथीयांनी शहर पोलीस ठाण्यात येऊनही राडा केला. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. मात्र, वाशिम शहरात हा राडा बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.