गडचिरोली (वृत्तसंस्था) गुरुवारी सकाळच्या सुमारास एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. मात्र, ६५ वर्षीय असलेल्या धाडसी शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने वाघाशी झुंज दिली. त्यामुळे वाघ जंगलात पळून गेला. रंजित कुटेश्वर मंडल (रा. विश्वनाथनगर, ता. मुलचेरा) असे वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी ९.३० एका वाजताच्या दरम्यान वृद्ध शेतकरी रंजित मंडल हे विश्वनाथनगर गावातील शेतात धान कापणी करत असतांना अचानक वाघाने डरकाळी फोडली. त्यामुळे मंडल निर्माण घाबरून शेतातील आंब्याच्या झाडावर चढत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. मंडल यांनी वाघाशी झुंज देत कसे तरी झाडावर चढले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी धाव वाघ जंगलात पळून गेला.
रंजित मंडल यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय पेडीगुडम तसेच वनविकास महामंडळ कार्यालय, वेलगूर या दोन्ही क्षेत्रात वाघाचा वावर आहे.