धरणगाव (प्रतिनिधी) येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्या. आशिष सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयात एकूण ३८ खटले तडजोड करून निकाली काढण्यात आले.
पंचन्यायाधीश म्हणून अॅड. संदीप पाटील यांनी काम पाहिले. लोकअदालतीमध्ये एकूण ६६ दिवाणी केसेसपैकी १ केस निकाली काढण्यात आली. २८३ फौजदारी केसेसपैकी ३७ फौजदारी खटले निकाली करण्यात आले. वादपूर्व ग्रामपंचायत, खटल्यांमध्ये महसूल बीएसएनएल सेवा यांच्या एकूण ४ हजार १९ प्रकरणांपैकी २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील ३७ फौजदारी खटल्यांमध्ये एकूण १२ लाख १४ हजार ३१० रुपयांची वसुली करण्यात आली.
वादपूर्व २११ खटल्यांमध्ये २६ लाख ६३ हजार ९६ रुपये वसुली करण्यात आली. या कार्यक्रमात वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. एस. पाटील, संजय बी. शुक्ला, राहुल पारेख, मनोज दवे, गजानन पाटील, प्रशांत क्षत्रिय, संदीप सुतारे, वसंतराव भोलाणे, ॲड. शरद माळी, राजेंद्र येवले, प्रदीप पाटील, एकनाथ पाटील, महेंद्र चौधरी, गणेश मांडगे, आसिफ कादरी हजर होते. कर्मचाऱ्यांमधून सहायक अधीक्षक जगदीश माळी, एस. पी. चौधरी, गणेश खाते, चौधरी, विनोद सपकाळे, ए. आर. बाविस्कर, ईश्वर चौधरी, आर. आर. साळे, एस. बी. भालेराव, गुलाब लांबोळे व शिपाई योगेश पाटील हजर होते.