भुसावळ प्रतिनिधी – शहरातील मुन्ना तेली पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने रस्त्यावर उभा असलेला स्टाईलने भरललेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने दोन्ही ट्रकमधील क्लिनर हे गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील मुन्ना तेली पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालक इकबाल युनूस समा वय ३९ रा. उपलेटा जि.राजकोट याने मंगळवारी २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता ट्रक लावला होता. हा ट्रक स्टाईलने भरलेला होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (जीजे २५ यु ४३२२) ने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकवरील क्लिनर हिान जियाज समा रा.हाडफोडी ता.उलपेटा जि.राजकोट आणि दुसऱ्या ट्रकवरील क्लिनअर (पुर्ण नाव माहित नाही) हे दोघे जखमी झाले. तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून ट्रकमधील स्टाईलचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बुधवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकीरण झाल्टे हे करीत आहे.