जळगाव (प्रतिनिधी) सहकार भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक दि. ११ व १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी उज्जैन, मध्यप्रदेश येथे संपन्न झाली. श्री महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री अतुलेशानंद सरस्वती महाराज, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकुर, राष्ट्रीय महामंत्री प्रा. डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, संरक्षक रमेश वैद्य व सहकार भारतीचे म. प्र. अध्यक्ष नारायणसिंह यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन बैठकीचे उद्घाटन करण्यात आले.
बैठकीत वर्षभरात संपुर्ण देशातील सर्व राज्यांमध्ये झालेले सहकार सप्ताहाचे कार्यक्रम, स्थापना दिनाचे कार्यक्रम व अन्य उपक्रमांवर विशेष चर्चा करण्यात आली. सहकार क्षेत्र हाच विकासाचा मुलभुत मंत्र आहे. त्यामुळे ग्रामविकास व महिला सबलीकरण यादृष्टीने सहकारातील विवीध आयामांचे (प्रकोष्ट) स्वतंत्रपणे अधिवेशने घेण्यासंबंधी निर्णय करण्यात आला. त्याच प्रमाणे २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनावरही चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे रमेशकुमार खानवी, प्रतापराव भोईटे व नंदिनी रॉय यांनी मांडलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
केंद्र सरकारने नव्याने बहुराष्ट्रीय सहकारी संस्था स्थापन केल्या व अर्थसंकल्पात बचत गट मत्स्यव्यवसाय व सहकार क्षेत्रासाठी विशेष तरतुदी केल्याबद्दल केंद्र शासनाचे अभिनंदन करण्यात आले. प्राप्तीकर कायद्यातील कलम २६९ प्रमाणे विवीध कार्यकारी सोसायट्यांना रोखीच्या व्यवहारात विशेष सुट देण्यात आली. त्याच प्रमाणे देशभरातील पतसंस्था व मत्स्यपालन संस्थांनाही देण्यात यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव पारीत करण्यात आला.

त्याच प्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुका नियमीत व्हाव्यात, सहकारी संस्थाची नोंदणी प्रक्रिया सुलभ व त्वरीत होण्यासाठी पाऊले उचलावीत नागरी सहकारी बँका सुरू करण्यासाठी लायसन्स बंदी घातली आहे, ही बंदी त्वरीत उठविण्यात यावी व नविन सहकारी बँकांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असे ठराव मांडण्यात आले.
सहकार क्षेत्रातील संस्थांचे विकेंद्रीकरण होवून अधिक बळकटीकरण व्हावे, सहकाराच्य माध्यमातुन सक्षम व सबळ समाजनिर्मितीसाठी मोठ्या नेटाने सहकार भारतीचे काम वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीस सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा डॉ. शशीताई आहिरे, सचिव विवेक जुगादे, राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर, राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप रामू पाटील आदींसह २५ कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या निमीत्ताने म. प्र. सहकार भारतीच्या कामालाही वेग येईल असे सचिव योगेंद्रसिंह शिसोदीया यांनी सांगीतले.राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकुर यांनी बैठकीचा समारोप केला.