जळगाव प्रतिनिधी । अयोध्या नगर परिसरात राहणाऱ्या भाजीपाला विक्रेता तरूणाची दुचाकी घरासमोरून चोरून नेल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. याबाबत गुरूवार १० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अयोध्या नगरात जितेंद्र संजय वारूळे वय ३१ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून तो आपला उदरनिर्वाह करतो. त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएल ९१७७ ही घरासमोर पाकींगला लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.
















