जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कानळदा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचतांना अचानक चक्कर येवून कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. जितेंद्र ज्ञानेश्र्वर बाविस्कर (वय २८, रा. काळनदा), असे मयत तरुणाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे सोमवारी गणरायाचे विसर्जनाची गावातून मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये गावातील जितेंद्र बाविस्कर हा तरुण सहभागी झाला होता. मिरवणुकीमध्ये नाचत असतांना सायंकाळच्या सुमारास जितेंद्रला चक्कर आला आणि तो जमिनीवर कोसळला. गावातील तरुणांनी लागलीच वाहनातून जितेंद्रला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतू याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत जितेंद्र मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास प्राथमिक तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.