भुसावळ ([प्रतिनिधी) साकेगाव शिवारात भरधाव वाहनाने धडक दिल्याने भुसावळ शहरातील 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 1 डिसेंबर रोजी रात्री सात वाजता घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंकज सुरेश भालेराव (36, आंबेडकर नगर, रेल्वे हॉस्पीटल रोड, भुसावळ) 1 रोजी सायंकाळी सात ते आठ दरम्यान भुसावळ-जळगाव महामार्गावरील बालाजी पेट्रोल पंपाजवळील साकेगाव शिवारात कुठल्यातरी भरधाव वाहनाने मनोज सुरेश भालेराव (39, आंबेडकर नगर, रेल्वे हॉस्पीटलजवळ, भुसावळ) यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे करीत आहेत.