धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील फुलपाट टाकळी गावात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने बांभोरी येथील गिरणानदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली आहे. श्याम प्रताप भिल (वय-३०, रा. फुलपाट) असे मयत तरुणाचे नाव आहे.
श्याम भील हा त्याचा भाऊ भुरा भील याच्यासोबत राहत होता. १० वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तर कोरोना काळात त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. शिवाय काही महिन्यांपासून तो आजारी देखील होता. वाळूच्या ठेक्यावर तो काही महिन्यांपूर्वी काम करत होता. पत्नीच्या मृत्यूनंतर श्याम हा तणावात होता. त्यामुळे गिरणा नदीच्या पुलावरून उडी घेण्यापूर्वी २ जणांनी त्याला टोकल्याचेही कळते. नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जळगाव तालुका पोलिसांना कळविले. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोहेकॉ अनिल फेंगडे, चेतन पाटील होमगार्ड अशोक वाघ यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.