अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गलवाडे रस्त्यावरील एका नगर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका नगर परिसरात राहणाऱ्या व हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील महिला घरी गेली असता तिला तिची मुलगी (वय १६ वर्ष ८ महिने) घरात दिसली नाही. तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. हे. कॉ. विनोद सोनवणे करत आहेत.