मुंबई (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, आमिर आता तिसऱ्या लग्नाची तयारी करतो आहे. असंही म्हटलं जातंय की, तो त्याची अपकमिंग फिल्म लाल सिंह चढ्ढा रिलिज झाल्यानंतर आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो त्याच्या सहकलाकार अभिनेत्रीशी लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बऱ्याच दिवसांपासून आमिर आणि फातिमा सना शेख यांच्या नावाची चर्चा आहे. तिलाही आमिरच्या नावावरुन ट्रोल करण्यात आले होते. अद्याप तिनं त्या नात्याविषयी कोणताही खुलासा केला नसला तरी त्यांना अनेकदा एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे.मात्र, दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमिरनं 1987 मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मग पुन्हा आमिरनं किरण रावसोबत संसार सुरु केला होता. दरम्यान, आमिर तिसरं लग्न कोणत्या अभिनेत्रीशी करणार अशा चर्चा सुरु झाल्यानंतर आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.