पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तथा जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांचे कट्टर समर्थक तसेच पाळधी येथील सामाजिक कार्यकर्ते आबा माळी यांची आज शिंदे गटाच्या जळगाव ग्रामीण युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
आबा माळी यांची आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव ग्रामीण युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी निवड करण्यात आली. आबा माळी हे सोशल मीडियात शिंदे गटाची तथा ना. पाटील यांची बाजू जोरदार मांडत असतात. त्यांच्या या निवडीबद्दल पाळधीसह तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर ना. गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आबा माळी यांनी दिली आहे.