TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा !

धरणगाव मध्ये हिंदुत्ववादी संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी)  वर्ष 1925 मध्ये ब्रिटिश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता; स्वातंत्र्यानंतरही मुसलमानांचे लांगूलचालन करणाऱ्या काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात वेळोवेळी सुधारणा करत ‘वक्फ बोर्डा’ला पाशवी अधिकार दिले. वर्ष 1995 आणि वर्ष 2013 मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्व धर्मीयांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचे अत्यंत भयानक अधिकार वक्फ बोर्डाला दिले. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. भारत सरकारच्या ‘भारतीय सेने’कडे सर्वाधिक 18 लाख एकर, ‘भारतीय रेल्वे’कडे 12 लाख एकर भूमी आहे. या दोघांच्या नंतर देशभरात तिसरी सर्वांत मोठी संपत्ती वक्फ बोर्डाकडे आहे. वर्तमानात वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरहून अधिक भूमीची मालकी आहे. हे असेच चालू राहिले, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल आणि पुन्हा एकदा एक मोठा भूभाग गिळंकृत करून भारतच्या पोटात नवा पाकिस्तान निर्माण होईल. यासाठी हा देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे येथे करण्यात आली.

वक्फ च्या माध्यमातून देशाच्या सामान्य नागरिकांवर पुढीलप्रमाणे अन्याय करण्यात येत आहे..अ. वक्फ बोर्डाने कोणत्याही संपत्तीवर दावा केल्यानंतर त्या संपत्तीचा राज्य सरकारकडून सर्व्हे केला जातो. त्यात मुसलमानांची धार्मिक संपत्ती वा अन्य काही संदर्भ सापडले, तर वक्फ बोर्डाला तिला ‘वक्फ संपत्ती’ म्हणून रजिस्टारकडे थेट नोंद करण्याचा अधिकार आहे.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

आ. असे करतांना ती भूमी ज्याची आहे, त्याला अर्थात भूमीच्या मालकाला काही कळवण्याची आवश्यकता नाही.

इ. दोन महिन्यात भूमीच्या मूळ मालकाने कोणताही आक्षेप घेतला नाही, तर ती संपत्ती कायमस्वरूपी वक्फ बोर्डाची होते. येथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने आपली भूमी हडपली जात आहे, हेच मूळ मालकाला न कळल्याने त्याचा आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही.

ई. जर कोणी आक्षेप घेतलाच, तर आक्षेप घेणाऱ्याला वक्फ बोर्डाला १५ दिवस आधी कळवायला हवे, अशीही तरतूद यामध्ये आहे. जेणेकरून काय आक्षेप आहेत, ते मोडून काढण्यासाठी बोर्डाला पूर्वतयारी करायला वेळ मिळेल.

उ. आक्षेप घेणाऱ्याला ‘सिव्हील कोर्टात जाता येणार नाही; कारण वक्फ बोर्डाच्या संपत्तीशी संबंधित सर्व वादविवाद ‘वक्फ बोर्ड ट्रीब्यूनल’ मध्येच चालवण्याची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणांची सुनावणी ‘सिव्हील कोर्टा’त होणार नाही.

याचा अर्थ वक्फ बोर्ड भूमी हडपणार, त्याचा तक्रार वक्फकडेच करायची, तपास वक्फच करणार आणि निवाडाही वक्फच देणार ! येथे न्याय सोयीस्करपणे मुसलमानांच्याच बाजूने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे न्यायालयाच्या अधिकारांवर गाद आणण्याचा आणि नागरिकांचा न्याय्यहक्क हिरावून घेण्याचा प्रकार आहे.

या निवेदनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –

  1. ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करण्यात यावा.

  2. आतापर्यंत या कायद्याचा वापर करत जी जी भूमी वक्फ बोर्डाने स्वतःची म्हणून घोषित केली आहे, ती ती प्रत्येक संपत्ती मूळ मालकाला देण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्यावरील वक्फ बोर्डाचा अधिकार पूर्णपणे संपुष्टात आणावा.

  3. धार्मिक पक्षपात करणारा, देशाच्या सुरक्षेला बाधक ठरणारा, नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेणारा हा कायदा बनवणारे, तो संसदेत मांडणारे, तो पारित करणारे या सर्वांवर देशाची फसवणूक अर्थात देशद्रोह केल्याबद्दल कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

यावेळी निवेदन देताना साहेबराव माळी, रोहन भाटीया,हेंमत दुतिया,अँड हर्षल चौव्हाण,इच्छेश काबरा,कातिलाल माळी,सुभाष पाटील,सनातन संस्था,किरण माळी धर्मप्रेमी,प्रल्हाद सोनवणे – धर्मप्रेमी,विनोद शिदे -हिंदु जनजागृती समितीचे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

रंगीबेरंगी आकाश कंदीलांनी सजली अमळनेरची जी.एस.हायस्कूल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्याचा मदतीचा हात : शेकडो रुग्णांचे होत आहे मोफत उपचार !

August 18, 2024

पत्नीला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत घडलं अघटीत ; ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी !

May 28, 2023

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना समर्थन देण्याकरिता सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो !

November 16, 2024

पिंप्री येथे तीन दिवसांचा लॉकडाऊन

March 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group